
चपल, चेतनामय शरिर आज
प्रेत होवून पडले होते
र्मुत्युने पाश आवळले
आणि धावयचे ते थांबले होते
आयुष्यभर धावपळीने
बिचारे पुरते थकले होते
कायमचीच सुट्टी घेवून
फ़ुरसतीने झोपले होते
नाती-संबंध जपता-जपता
स्वतःलाच ते विसरले होते
जीवनाच्या प्रवासात अनेकदा
निखार्यावरुन चालले होते
कशाच्रीच आता चिंता नव्हती
कशाचेच दुःख राहीले नव्हते
शरणावरती पडल्यावर ही
शांत संयमी वाटत होते
धगधगत्या ज्वाळांमध्ये
आनंदाने ते जळत होते
जणु शरिराची राख करुन ते
स्वर्ग सुखचं अनुभवत होते
- महेश जाधव
No comments:
Post a Comment