
वेड्या मनाला
पाऊसाची ओढ लागलेली
मातीच्या सुगंधाची आठवण
तशीच मनी साठलेली
आला होता पाऊस तो
ते क्षण सुखाचे घेउन
हिरवळ गेल्या पाऊसाची
माझ्या मनात दाटलेली
एका छत्रीत आमची
मन एक झालेली
छत्री बंद करून ती
पाऊसात चीम्भ भिजलेली
विजेच्या साक्षीने ती
मिठीत माझ्या सुखावलेली
शहार्नार्या अंगाची
ऊब वाटून घेतलेली
पाऊसाची पहिली सर अन
तिची आठवण आलेली
पाहायचंय मला पुन्हा ती
तशीच चीम्भ भिजलेली
असेन ती कुणाच्या मिठीत
का ती हि एकटीच असेल
अश्रुंनी आज माझ्या
पाउसास साथ दिलेली
वेड्या ह्या मनाला
पाऊसाची ओढ लागलेली
हिरवळ गेल्या पाऊसाची
तिच्या-माझ्या मनात दाटलेली
- महेश जाधव (३-६-२०११)
पुन्हा तो पाऊस बरसेल
पण मी मात्र एकटाच असेल
वीज हि तशीच गड्गडेल
पण... मिठीत माझ्या ती नसेल
- महेश जाधव (३-६-२०११)
No comments:
Post a Comment