बरसलास नभातुनी
बरसलास मालरानातुनी
फुटली कोवळी तृण
तहानलेल्या मातीतुनी.....
थेंब तुझेच ते
रंगविली ज्यांनी धरा हिरवी
बरसलास रानातूनी
बरसलास पानापानातुनी
कोसळली... सर ती तुझीच
सयेची आठवण घेउनी
बरसलास मनातुनी
बरसलास डोळ्यातुनी
असाच बरस...बरसत रहा...
पार कोरडं होई पर्यंत!!!
- महेश जाधव
No comments:
Post a Comment