Monday, July 18, 2011

औकात

थांबवू नका मला...
मला हि लढु दे
औकात माझी
मला हि कळू दे

वाहतील रक्ताचे पाट जरी
धरा लाल....आसमंत सुन्न जरी
रणांगण शौर्याने मला पेटवू दे
औकात माझी मला हि कळू दे

आक्रोश दाही दिशा व्यापेल
हाडा-मांसाचा चिखल साचेल
आज रक्तानेच त्यांच्या अभिषेक करू दे
औकात माझी मला हि कळू दे

शांततेला.. दुर्बल म्हटले
संयमाला भेकड
परिणाम त्याचे त्यांना भोगू दे
औकात त्यांची...आता त्यांना हि कळू दे
- महेश जाधव

No comments: