मी काळाच्या पेकाटात लाथ घालून आलोय
मी ललाटीच्या नशिबाला फाटा देऊन आलोय
मी ठरवल माझं भूत...आणि ठरविणार भविष्य हि
मी हातावरच्या रेघांना मनासारखं रेखाटून आलोय
उभा होतो मी हि कधी कुबड्यांचा आधार घेऊन
त्या कुबड्यांना मी दुसर्यांसाठी फेकून आलोय
रडलो, झगडलो... अन हरलो कधी जिच्या पुढे
त्या परिस्थितिला समोर माझ्या मी झुकवून आलोय
- महेश जाधव
No comments:
Post a Comment