हिमनगाची खोली मी
मृगजळाचा आभास मी
कधी शांत संयमी सागरात
कधी अल्लड नदीच्या प्रवाहात मी
कधी आर्श्यातील प्रतिबिंब मी
अन अंतरंगातली भिन्नता हि मी
कधी अश्रुंचा ओलावा मी
कधी ह्रदियातील पाषाण मी
नभा पलीकडली नजर कधी
शरमेने झुकलेली मान मी
परिस्थितीचा आसूड कधी
अन प्रतीकुलतेतील अनुकुलता हि मी
सूर्याची दाहकता मी
चंद्राची शितलता मी
कधी तीर्थातील पवित्रता मी
कधी प्याल्यातील मदिरा हि मी
लपवितो ओळख जगापुढे जरी
डोळे मिटलेला उघडाच मी
भेटतो लाख रुपात मलाच तरी
उरतो एकांत आणि एकटाच मी
- महेश जाधव
No comments:
Post a Comment