Friday, August 12, 2011

मी जाळली ती गजल

मी जाळली ती गजल, सरणावरती पडलेली
दुःखाचे व्रण घेऊन काळजावरती ठसलेली

लिहिली तेव्हा तरुण होती, आता जीर्ण झालेली
जळुन खाक होई पर्यंत, नसा-नसात भिनलेली
मी जाळली ती गजल, सरणावरती पडलेली

सुख-दु:ख, प्रेम, विरह की आणखी काही
सोबत माझ्या, हसली अन रडलेली
मी जाळली ती गजल, सरणावरती पडलेली

जळत ती होती आणि मी हि होतो
सोबत आमची चितेला अर्पण केलेली

मी जाळली ती गजल, सरणावरती पडलेली
दुःखाचे व्रण घेऊन काळजावरती ठसलेली
- महेश जाधव

No comments: