Thursday, August 18, 2011

दिवे विझुन आता, अंधारास सामील झाले
डोळे हि माझे, गर्भात लीन झाले

पाहतो वाट कोण आता, उद्याच्या उष:कालाची
काळोखात माझे, स्वप्न रंगवून झाले

केले हिशेब चुकते, दिवसा जमले न कधी जे
रात्रित ते सारे, प्रश्न सोडवून झाले

आता निर्धास्त मी, झेलण्या वार नव्याने
जुन्या सर्व जखमांचे, अंधारात रडून झाले
- महेश जाधव

No comments: