Friday, August 12, 2011

शब्द झाले वैरी

शब्द झाले वैरी, जवळ करू कशाला
फास आवळती ओळी, लिहु कशाला

बधीर झाली मन, संवेदना हि बधीर
कागदावरती ठिपके, मी सांडवू कशाला?

आपलेच होते ज्यांनी, वार केले पाठी
नात्यांवरती विश्वास, मी ठेवू कशाला?

तुडविला धर्म पायी, जैसे चोखा मुला
संस्काराची भाषा, मी करू कशाला?

फाटका संसार माझा, तिच्या चोळी जैसा
उधारीचे मणि काळे, मी ओवु कशाला?

बाजार भरला प्रेमाचा, विक्रीला हि जोर
प्रेमासाठी घाव, सहन करू कशाला?

शौर्य इथे लाचार, झुकते पैश्या पुढे
लढाई अंतरीची, बाहेर लढु कशाला?

मंदिरात बसलेला, तो हि हतबल
उगाचच दगडास देव, मी मानू कशाला?
- महेश जाधव

No comments: