Tuesday, October 4, 2011

सोडुन गेल्या शब्दांचा, मागोवा मी घेत नाही
जुन्या जाख्मांसाठी नव्याने रडणं होत नाही

ओरबाडून आठवणी, गाडल्या मी निर्दयपणे
पाण्यात बुडवून नाती, काठावर शोध घेत नाही
...
ठिणगी वणव्याची, घरावर माझ्या पडलेली
जळक्या घराची आता, राख मी चाळत नाही

तुडवितो पायी वाट, दिशांना लक्ष करून मी
कुंपणाचे बंधन, मला कधी अडवत नाही

सोडुन गेल्या शब्दांचा, मागोवा मी घेत नाही
जुन्या जाख्मांसाठी नव्याने रडणं होत नाही
- महेश जाधव

No comments: