Friday, September 23, 2011

माजले रण भोवताली,
कसे ठेवू शस्त्र खाली
झेलण्यास चुकेन वार,
गद्दार, ढाल हि झाली

... कपाळी शेंदूर लाल
मंदिरी जपली माळ
तरी अवकृपा देवाची
दक्षिणेसाठी, नशिबी आली

भोगतो एकलाच वणवास
राज-पाट करुनी त्याग
साथीस कुठे लक्ष्मण,
सीता हि आली?
- महेश जाधव

No comments: