Friday, September 23, 2011

सजलेले सेज, जागलेली ती रात्र

सोबत अंधाराची, उदास ती रात्र

आठवणींचा खेळ, जीव गेला ती रात्र

अश्रूंच्या मुंडावळ्या, रडलेली ती रात्र

एकांत शांत, आक्रोशाची ती रात्र

हळुवार संगीत, हुंदक्यांची ती रात्र

ओळखीची वाट, चाचपडणारी ती रात्र

सांत्वनाची गर्दी, रुसलेली ती रात्र

मालवून दिवे, जळणारी ती रात्र

आठवण तिची तशीच आणि तशीच ती रात्र
- महेश जाधव

No comments: