गाव सोडून दूर जाणारी
ती वाट ओली होती
समजावले तिला मी
ती फारच हळ्वी होती
अडवत होते पाउल
दगड उगाच मध्ये येऊन
साथ देण्यास त्यांना
वळणे सरसावली होती
दिली साद झाडाने
ज्यावर बालपण लटकलेले
स्पर्षून मला पारंबी
त्याची आठवण देत होती
निरोप शेवटी घेतला
जड अंत:करणाने
काठ सोडून नदी
अश्रुत बुडाली होती
- महेश जाधव
No comments:
Post a Comment