सलाम त्या बंद्यांना
ज्यांनी हाती शीर घेतले
रुतले भाले छाती मध्ये
देशासाठी ते वीर पेटले
दिली आहुती प्राणांची जरी
अमर त्यांचे बलिदान झाले
झुकले मरण हि शौर्य पुढे त्या
मरणाशी ते जवान लढले
फाशीचा तो दोर हि धन्य
ज्यावर हसत देशभक्त लटकले
कापत होता काल हि तेव्हा
वंदेमातरम मुडद्यानी हि म्हटले
- महेश जाधव
No comments:
Post a Comment