Thursday, September 8, 2011

सांगावे कुणाला कळेना
बोलावे कुणाशी कळेना
शिवलेले ओठ आज
नकळतच उसवलेले
आवाज अंतरीचा
दाबावा कसा कळेना

भांडलो मी होतो
एकांतात अनेकदा
आज या मनाला
समजवावे कसे कळेना

ऐकून घेतले मी
नि:शब्द होऊन सारे
शब्दात ते
मांडावे कसे कळेना
- महेश जाधव