Friday, September 23, 2011

झुंजू-मुंजू रानात
ताल पाना-पानात
रान मोतियांचा सडा
ढग दाटले नभात

गार झोंबतो हा वारा
हिरवी टच हि धरा
कुठे कुठे उगवला
अवखळ हा झरा

नभ पंखात भरून
गेलं पाखरू भिजुन
नितळ वाटेवर
पाय टाकतो जपुन
- महेश जाधव

No comments: