स्पर्श ते हळुवार, मज सांगून गेले काही
दु:ख ते अंतरीचे, स्पर्श मांडून गेले काही
नको म्हणता म्हणता.. झालाच पसारा भावनांचा
अश्रु ते एकांतात, ओघळून गेले काही
का अडविती ह्या वाटा, समजवावे त्यांना कसे हे
इथल्या वळणावरचे, भोग भोगून गेले काही
धरती हि चेतलेली, आकाश हे निरभ्र
आताच मेघ काळे, बरसून गेले काही
बझार हाच खरा एक, सौदा इथला रोक
आवाज इथे पैशाचा, नाती विकून गेले काही
कशास हवी चिंता, उद्याच्या उष:कालाची
भविष्यात जगण्यासाठी, आज मरून गेले काही
- महेश जाधव
No comments:
Post a Comment