डोंगरावरल्या माते तुला
घालतो म्या साकड
क्रिपा करावि माय
उपाशी माझी लेकर
... जातं सारखं इचारतंय
दाना कवा मिळणार
चुल बी माय थंडावली
ती सरपन कधी गिळणार?
घाम पेरलेला म्या मातीत
उगायच्या आन्धीच सडून गेलं
पावसाला उत आला
भडव्याने सुख वाहून न्हेल
गुरा-ढोरांची काळजी नाय माय
ती सावकाराच्या दावणीला गेल्याती
घर पण घान त्याच्या पाशी
या वरसापुर्ती मुदत दिल्यानी
पोर माझी जगू दे माय
पडतो तुझ्या पाया
चूक माफ करावी
नाय तर तयार हाय मराया
डोंगरावरल्या माते तुला
घालतो म्या साकड...
- महेश जाधव
No comments:
Post a Comment