असंख्य लाटांशी स्पर्धा करुन
मी माझी नाव पुढं रेटतोय
लाख जख्मा सहन करुन
मी माझं सुखं शोधतोय
सुखं काय असेल कसं असेल,
याचाच विचार करतोय
क्षणिक सुखाला बळी पडून
दुःखाचं अस्तित्व मात्र नाकारतोय
कायम दुःखाची सोबत मला
त्याच्याच मुळावर घाव घालतोय
सत्याकडे पाठ फ़िरवून
र्मुगजलाच्या मागे धावतोय
दुःख विसरुन, सुखं मिळेल
याच आनंदात आता जगतोय
दुःख विसरने हेच मोठं सुखं
हे मी का विसरतोय?
- महेश जाधव
No comments:
Post a Comment