
धडधडत्या ह्र्दयाने थरथरत्या ओठांनी
तिला 'आय लव्ह यू' म्हटलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
रोज लेक्चर बंक करुन तिच्या क्लास बाहेर
वेळेवर उपस्थिती लावली पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
तिला पाहण्यासाठी घरा समोर तिच्या
तासनतास उभं राहिलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
इस्रीचे कपडे घालून महागडं परफ़्यूम लावून
तिच्या मागं मागं फ़िरलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
वाढदिवसाला तिला उधारीच्या पैशानं
छनसं गिफ़्ट ही घेतलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
कैन्टिन मध्ये तिच्या सोबत कटींग चहा विसरुन
कॉफ़िची लज्जत लूटली पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
फ़र्स्ट डे फ़र्स्ट शोचा कोपर्यातील सिटवरुन
रोमांटिक सिनेमा पाहिला पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
पावसाळ्याच्या दिवसात छत्री घरीच ठेवून
तिच्या सोबत चिंब भिजलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
लूटपुटीच्या भांडणात काही काळ्च्या दूराव्याने
डोळ्यात पाणी आलं पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
भाडोत्री बाईकवर तिला मागे बसवून
वार्याशी स्पर्धा केली पाहिजे
एकदा तरी प्रेम केलं पाहिजे
- महेश जाधव
No comments:
Post a Comment