Tuesday, January 2, 2007

शेवटची भेट


शेवटच्या भेटीत मी तुला म्हणालो...
तो सप्तमीचा चंद्र बघ...
माझं आयुष्य ही तुझ्याविना असंच अर्धवट राहिल...
तू म्हणालीस...थोडा धीर धर...
चंद्र पुन्हा पुर्ण होईल...
तुझ्या आयुष्याता ही पोर्णिमा येईल पण...
आज ही चंद्र तसाच अर्धा आहे
तुझ्या विना तो पुर्ण होणारच नाही
मला माझा पुर्ण चंद्र दे...
तू आता परत ये...

तुझ्या विना श्रावण सरी आता मला सुखावत नाहीत
मला भिजवणारा ओळावा पावसात ही उरला नाही
नदीत डुंबूनही तहाण काही शमत नाही
ही तहाण, हे कोरडेपण आता सहन होत नाही
मला पुन्हा प्रेमाचा ओळावा दे...
तू आता परत ये...

हसणं तर कधीच विसरलोय..
साधं स्मित हास्याची लकेर ही चेहर्यावर उमटत नाही...
मनावर फ़क्त दुःखाचं साम्राज्य पसरलयं...
बंद घरातील कोळीष्टका सारखं
मनाची बंद कवाडं पुन्हा आता उघडू दे
माझं गोठलेल हसू तूच मला पुन्हा दे....
तू आता परत ये...

डोळ्यातलं पाणी आटण्या आधी
श्वासाचे गर्म उसासे थंड होण्याआधी
श्वासातील गर्म उसासे थंड होण्याआधी
ह्रदयातील आक्रोश थांबण्याआधी
शरीरातील चेतना बंद होण्याआधी
चितेला आग लागण्याआधी
माझी राख होण्याआधी
तू लवकर परत ये...
ती राख ही उडून जाण्याआधी...
- महेश जाधव

1 comment:

Alone Dreamer said...

Some people in life are part of you,
and when you let them go,
You never lose them.
Becoz...
You find them living in you...

good one mahesh...