Wednesday, January 3, 2007

एक अश्रु नक्की गळेल




बंद करा हे शब्दांचे खेळ
पुरे झाली प्रेम संबंधाची भेळ
अरे पहा त्या शेंबडया पोराला
बिच्चारं असुसलयं भाकरीच्या टुकड्याला
कोणी गातयं प्रेमाचे पोवडे
कोणी प्रेम भंग म्हणुन सदा रडे
इथं कपडा ही नाही शरीर झाकायला
मजबुर ते अब्रु उघड्यावर टाकायला
तुमच्या ओळीत फ़क्त प्रेमचं सजतं
पण गरीबीला सुध्दा मन असतं
त्यांना ह्री आवडेल आपल्या सारखं जगायला
एक वेळ तरी भरपेट जेवायला
रस्त्यावर आला जरी संसार त्यांचा
काय त्याच्याशी संबंध आमचा
इथं वेळ नाही माणुसकी दाखवायला
दुसर्याचं दुखं आपलं मानायला

कशाला लिहा चार ओळी त्यांच्यासाठी
आमच्या कविता फ़क्त प्रेमासाठी
जन्मचं त्यांचा गरीबी भोगायला
उपाशी पोटाची कळं सोसायला

मनावर पडोत त्यांच्या आत्महत्येच्या गाठी
वेळ नाही आम्हाला त्यांच्यासाठी
शेंबडं पोर जरि तरसलयं भाकरीला
लगतयं ना तुप आमच्या पोळीला

मिञ हो,
तुमचं आयुष्य सुखात जावो
नका फ़ोडु गरीबांसाठी टाहो
पण कधीतरी तुम्हाला गरीबाचं दुःख कळेल
नाहि रडलात तरी एक अश्रु नक्की गळेल

- महेश जाधव

No comments: