Monday, February 13, 2012

तो, ती की पाउस

पाउस पडतो
रात्र भिजते
मालवून सारे दिवे
ती त्याच्यासाठी रडते

तो हि तसाच
खिडकीतून पाउस पाहतो
भिजलेल्या रस्त्यावरून
भिजलेली नजर फिरवतो

जस जशी रात्र वाढते
तळमळ हि वाढत जाते
आठवणीच्या फुल पाकळ्या
एक एक करून खुडली जाते

अनावर होत जाते मग
वेदना दुराव्याची
अन सुरु होते स्पर्धा
तिची, त्याची अन पावसाच्या बरसण्याची

.... पाहुया हि रात्र कोण जास्त भिजवतो
तो, ती की पाउस
- महेश जाधव

No comments: