Friday, February 10, 2012

न भांडतो कधी, न व्यक्त होतो
आसवांना माझ्या शब्द म्हणतो

न फुलांचे रंग, न गंध मिसळले
कोर्या जीवनास रंगीन म्हणतो

न घरास भिंत, न छप्पर मिळाले
झोपडीस माझ्या महाल म्हणतो
- महेश जाधव

No comments: