Tuesday, July 31, 2012

नेहमी स्वतः वरती कविता करायला सांगणारी ती 
आज पावसावर कविता कर म्हणाली 
मी हसत म्हटले 
तो तुझ्या एवढा सुंदर नाही 
आणि मला आता...
भिजायला हि आवडत नाही
...

पाऊसाची पहिली सर अन
तिची आठवण आलेली
पाहायचंय मला पुन्हा ती
तशीच चीम्भ भिजलेली

असेन ती कुणाच्या मिठीत
का ती हि एकटीच असेल
अश्रुंनी आज माझ्या
पाउसास साथ दिलेली

...
पुन्हा तो पाऊस बरसेल
पण मी मात्र एकटाच असेल
वीज हि तशीच गड्गडेल
पण... मिठीत माझ्या ती नसेल
- महेश जाधव

No comments: