भरून आलेलं आभाळ
आणि मावळ्यानसारखे दबा धरून बसलेले ढग
आता हे आपल्याला सोडणार नाहीत...
ह्याची पक्की खात्री झाल्यावर
मुकाट्याने ऑफिस बाहेर पडलो
अंदाज खरा निघाला,
हराम खोराने गाठलेच मला
जेवढे होते ते आणि जिथे जिथे पोहचता येईल ते सर्व भिजवत राहिला
अचानक ती समोर आली
डोक्यावर छत्री धरत म्हणाली किती भिजलास तु
स्वतःला निथलताना पाहत होतो... अन तितक्यात छत्री दूर झाली
तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत म्हटले
आता भिजता येत नाही...
इतका कोरडा झालोय
.
.
गाफील राहिल्याने ह्या वर्षी हि माझे लेदर शू प्राणाला मुकले
.
.
तिच्या नवर्याने मात्र पावसाळ्याची आधीच सोय केली होती
- महेश जाधव

No comments:
Post a Comment