वाटलेच कधी तुला तर येऊन जा
दार तसे घराचे उघडेच असते
नसेल.. तर खिडकीतून डोकावून जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
अंगणात तुझा प्राजक्त छान बहरलाय
ओंजळभर सुगंध त्याचा घेऊन जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
तुझी-माझी पायवाट... उदास असते हल्ली
दोन पाउल ठसे तिला देऊन जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
खुप वाट पाहिली तुझी...आता मिणमिणतोय शेवटचं
जमलेच तर मिटण्याआधी...मला हि पाहुन जा
.
.
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
- महेश जाधव
दार तसे घराचे उघडेच असते
नसेल.. तर खिडकीतून डोकावून जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
अंगणात तुझा प्राजक्त छान बहरलाय
ओंजळभर सुगंध त्याचा घेऊन जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
तुझी-माझी पायवाट... उदास असते हल्ली
दोन पाउल ठसे तिला देऊन जा
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
खुप वाट पाहिली तुझी...आता मिणमिणतोय शेवटचं
जमलेच तर मिटण्याआधी...मला हि पाहुन जा
.
.
वाटलेच कधी तुला तर येऊन जा
- महेश जाधव
No comments:
Post a Comment